जळगाव: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. आज ते जळगावात असून त्यांनी यावेळी जळगावातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करत काही सूचना प्रशासनाला केल्या आहेत. मात्र त्यांच्या हा दौरा राजकीय दौरा असल्याचा आरोप कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून होत आहे. यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे, कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते घरात बसले आहेत, त्यांना लोकांची चिंता नसेल आम्हाला चिंता आहे. आम्ही राज्यात फिरणारच अशा शब्दात त्यांनी कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना काहीही वाटत असले तरी जनतेला सर्व माहित आहे. लोकांना बरे वाटत आहे, कि कोणीतरी येऊन आमचे दु:ख पाहत आहे. त्यामुळे त्यांना टीका करू द्या असेही फडणवीस यांनी सांगितले.