कॉंग्रेस सत्तेत आल्यास आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देऊ: राहुल गांधी

0

हैदराबाद: केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास गरिबांना ७२ हजार रुपये वर्षाला देण्याचे आश्वासन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले होते. त्यानंतर त्यांनी आता कॉंग्रेस सत्तेत आल्यास आंध्रप्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्यात येईल, असे आश्वासन दिले. विजयवाडा येथे प्रचार सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी हे आश्वासन दिले.

मोदी गेल्या पाच वर्षापासून देशाची सत्ता सांभाळत आहेत. त्यांनी त्यांचे आश्वासन पूर्ण केले नाही. तरीही आंध्रप्रदेशातील राजकीय पक्षांनी मोदींकडे ही मागणी आक्रमकपणे का लावून धरली नाही, याचं मला आश्चर्य वाटतं, असं राहुल म्हणाले. यावेळी त्यांनी न्याय योजनेची माहिती देत सरकार आल्यास या योजनेचा गरिबांना फायदाच होणार असल्याचे स्पष्ट केले.