मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस, राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात भाजप-सेनेत ऑऊट सुरु आहे. दरम्यान माजी मंत्री आणि काँग्रेसने त्यावर्षा गायकवाड या लवकरच पक्षांतर करणार असलेल्या चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. यावर गायकवाड यांनी काँग्रेस माझ्या रक्तातच आहे. माझ्या घरात काँग्रेसची परंपरा आहे. शेवटपर्यंत आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे गायकवाड यांनी ठणकावले. तसेच आपल्या पक्षांतराच्या ज्या बातम्या पेरल्या जात आहेत, त्यात तथ्य नसल्याचे सांगितले.
विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीत वर्षा गायकवाड उपस्थित राहू शकल्या नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पाठबळ मिळाले होते. मात्र यावर खुद्द वर्षा गायकवाड यांनीच प्रतिक्रिया दिली. आजारी असल्यामुळे आपण मुलाखतीला जावू शकलो नाही, असे त्यांनी सांगितले. वर्षा गायकवाड यांचे वडिल एकनाथ गायकवाड यांना नुकतेच मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. काँग्रेसकडून देण्यात आल्यामुळे जबाबदारी यामुळे गायकवाड कुटुंबीय पक्षांतर करेल, याची शक्यता कमीच आहे.