कॉइनट्राइबची १० दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी

0

मुंबई :-कॉइनट्राइब या सुक्ष्म छोट्या-मध्यम उद्योगांना पताधारित कर्ज देणाऱ्या भारतातील अग्रगण्य बाजारपेठेने, गुंतवणुकीच्या मालिका-बफेरीतून साबरे पार्टनर्स आणि पूर्वीपासूनचे गुंतवणूकदार पुनीत दालमिया यांच्या माध्यमातून १० दशलक्ष डॉलर्सचे समभाग भांडवल उभे केल्याचे जाहीर केले.

या निधी उभारणीच्या फेरीनंतर, कॉइनट्राइबने उभे केलेले एकूण समभागभांडवल १५ दशलक्ष डॉलर्स पर्यंत गेले आहे. आपल्या मालकीच्या ऑनलाइन पत अल्गोरिदम क्षमता अधिक वाढवण्यासाठी, नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यासाठी आणि वेगवान व चपळ उत्पादन व पत प्रारूपे तयार करण्यासाठी हे अतिरिक्त भांडवल वापरण्याची कॉइनट्राइबची योजना आहे.

या व्यवहाराबद्दल कॉइनट्राइबचे सहसंस्थापक आणि मुख्यकार्यकारी अधिकारी अमित सचदेव म्हणाले, “साबरे पार्टनर्सचे आम्ही स्वागत करतो आणि आमच्या वाढीच्या नवीन लाटेत साबरेसोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. कॉइनट्राइबमध्ये आम्ही एक वेगळे व्यवसाय प्रारूप विकसित केले असून, याचा मुख्यभर कमी भांडवलव, कमी जोखीम, सकारात्मक एक अर्थशास्त्र आणि पत व तंत्रज्ञानातील क्षमता यांवर आहे. आघाडीच्या वित्तीय संस्थांनी आमच्या या मॉडेलला मान्यता दिली आहे. आमच्या क्षमतांचा तपशीलवार अभ्यास केल्यानंतर त्यांनी आमच्यासोबत भागीदारी केली आहे. आम्ही आमच्या भागीदारांसोबत वचनबद्ध आहोत आणि या निधी उभारणीमुळे आम्हाला आमचे बाजारपेठेतील व्यवहार वाढवण्यास तसेच अधिक भक्कम करण्यास मदत होणार आहे. यापुढे आम्हाला साबरे पार्टनर्सच्या वित्तीय सेवा क्षेत्रातील समृद्ध अनुभव व ज्ञानाचा लाभ मिळणार आहे.