पाचोरा । अतिक्रमणाच्या विळख्यातून पाचोरा शहराचे हायवे रस्ते मोकळे झाले आहे. या रस्त्यांवर पून्हा नव्याने अतिक्रमण होवू नये या साठी सार्वजनिक बांधकाम विभागात सतत जागरुक रहावे लागणार आहे. ह्या रस्तांवर अतिक्रमणांची काही दिवसांनी सुरुवात झाल्यास पून्हा अपघातातून जीव घेणे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी शहरातून जाणारा राष्ट्रीय महार्माग क्रमांक 19 वरील रस्त्याच्या काँक्रीटी करणासाठी नाशिक सार्वजनिक प्रादेशिक विभागाकडे 50 लाख रुपयाची मागणी केली आहे. एका पत्रकाद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. अतिक्रमणामुळे जारगांव चौफुलीवर 17 रोजी 2 तरुणांचा अपघातात मृत्यू झाला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच अधिकार्यांच्या दुर्लक्षातून ह्या मार्गाच्या रस्त्यांवर प्रचंड अतिक्रमण वाढले आहे. अद्यापपर्यत 10 ते 15 इसमांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. नुकताच अपघाताच्या घटनेमुळे प्रशासनातील सर्व अधिकार्यांनी एकत्र येवून हायवे रस्त्या लगतच्या महाराणा प्रताप चौक, जारगांव चौफुली, भारत डेअरी चौफुली ते जळगाव चौफुली वरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची धडक कार्यवाही करुन रहदारीला अडसर व जीवघेणे अतिक्रमण हटविण्यात आल आहे. आमदार पाटील यांच्या अतिक्रमण हटाओ आदेशाचे, पो.नि.श्याम सोमवंशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीराम बोंद्रे, न.पा. मुख्याधिकारी किरण देशमुख हया अधिकार्यांच्या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक
होत आहे.