जळगाव । महाराष्ट्रात संघटन विस्तारासाठी केंद्रीय स्तरावरून कॉग्रेसने पाउले उचलली असून राज्यात ठिकठिकाणी मेळावे घेतले जाणार असून याची सूरूवात जळगाव जिल्ह्यातून करण्यात आली. यावेळी संघटन विस्ताराचा एल्गार जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. गोदावरी अभियांत्रिकीच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेशस्तरातील पदाधिकारी उपस्थित होते.
संघटन विस्तारासाठी प्रयत्न करावे
भारतीय महिला कॉग्रेसच्या सरचिटणीस बेटा डिसुझा यांनी मार्गदर्शन करतांना आगामी काळात महिला संघटन विस्ताराकडे विशेष लक्ष घातले जाणार असून जास्तीत जास्त महिला सदस्यांची नोंदणी केली जाणार असल्याचे सांगीतले तर महाराष्ट्र प्रदेश महिला कॉग्रेस अध्यक्ष चारूलता टिकस यांनी संघटन वाढीसाठी प्रत्येक जिल्हाध्यक्ष,तालुका, व ब्लॉक अध्यक्षावर जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगून संघटन विस्ताराचा एल्गार फुंकला प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील यांनी संघटन विस्तारासाठी कसे प्रयत्न करावे याबाबत मार्गदर्शन केले.
प्रमुख पदाधिकारी उपस्थित
अखिल भारतिय महिला कॉग्रेस सरचिटणीस मा.बेटा डिसूझा, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉग्रेसच्या अध्यक्ष चारूलता टिकस, प्रदेश कॉग्रेसचे उपाध्यक्ष माजी खा डॉ उल्हास पाटील,जळगाव जिल्हयाच्या अध्यक्ष सुलोचना वाघ, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, सरचिटनिस अजाबराव पाटील, जि.प सदस्य प्रभाकर सोनवणे, एन.एस.यु.आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, युवक कॉग्रेस जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, माजी जि प सदस्य संजय पाटील डी एम पाटील आदि मान्यवर उपस्थीत होते. प्रमुख मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देउन माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, व प्रदेश उपाध्यक्ष माजी खा डॉ उल्हास पाटील यांनी केले.