कॉन्क्वेस्ट महाविद्यालयात शिक्षकदिन उत्साहात

0

सांगवी : चिखली येथील कॉन्क्वेस्ट महाविद्यालयात शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष व जलतज्ज्ञ अनिल पाटील, संचालिका प्रा. नेहा बोकील व प्राचार्य प्रदीप कदम यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी रोपटे देऊन शिक्षकांचे स्वागत केले.

शिक्षक संस्कृती जपणारा कणा
यावेळी मनोगत व्यक्त करताना अनिल पाटील म्हणाले की, शिक्षक हा भारतीय संस्कृतीला जपणारा कणा आहे. त्या आधारावरच या देशाच्या पिढीचे भवितव्य अवलंबून आहे, असे त्यांनी सांगितले. प्रा. नेहा बोकील, प्रा. योगेश आत्तरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्राचार्य प्रदीप कदम यांनी युवकांच्या भूमिका व शिक्षण, महापुरुषांचे प्रेरणादायी विचार व कृती, शिक्षकांचा आदर्श व संशोधनात्मक दृष्टिकोन भारताला महासत्ता बनवण्यासाठी उपयुक्त आहे, असे मत व्यक्त केले.

संयोजनात यांचा हातभार
यावेळी रासेयोचे प्रा. दयानंद ओव्हाळ, प्रा. अनिता जाधव, प्रा. स्मिता वैराट, प्रा. संतोष शिंदे, प्रा. अमोल कवडे, प्रा. वैभव पताळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक राज काळजे यांनी केले. सूत्रसंचालन सुमित बधाले यांनी, तर किशोर राठोड या विद्यार्थ्यांने आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नयना सरोदे, प्रा. सारिका भोसले, प्रा. धनश्री भारंबे, प्रा. पल्लवी धांडे, प्रा. रेखांजली गाडेकर यांनी परिश्रम घेतले.