कॉपीमुक्तीचा बट्ट्याबोळ

0

जळगाव । जिल्ह्यात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी व बारावीची परीक्षा सध्या सुरु आहे. राज्यभरात शिक्षण विभागातर्फे कॉफीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. कॉफीमुक्त अभियाना प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व शाळा महाविद्यालयात कॉफीमुक्त अभियानाची शपथ घेण्यात आली. मात्र जिल्हात कॉपीमुक्त अभियानाचा बट्याबोळ झाला असून अभियानाचा पुरता धज्जा उडाला आहे. राज्य माध्यममिक मंडळातर्फे घेतल्या जाणार्‍या दहावीच्या परीक्षेत एकुण 46 तर बारावीच्या एकुण 20 विद्यार्थ्यांजवळ कॉफी आढळल्याने डीबारची कारवाई करण्यात आली आहे. परीक्षेकरीता जिल्ह्याभरात एकुण 15 पथके नेमण्यात आली होती. या पथकात गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांचा समावेश होता. फिरते पथक असतांनाही सर्रासपणे विद्यार्थी कॉफी करतांना आढळले होते. दहावीची परीक्षा 7 मार्च पासून सुरु आहे तर बारावीची परीक्षा 28 फेबु्रवारी ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आली.

मराठीला सर्वाधिक कारवाई
राज्याभरात मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य सांस्कृतिक मंत्रालयातर्फे विविध उपाययोजना व उपक्रम राबविण्यात येत आहे. नुकत्याच 27 फेबु्रवारी रोजी झालेल्या मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी काय उपाययोजना कराव्यात यावर भाष्य करण्यात आले. शालेय अभ्यासक्रमातील सर्वात सोपा विषय म्हणून मराठी भाषेकडे पाहिले जात असते. मात्र दहावी व बारावीच्या मराठी विषयाच्या परिक्षेत एकुण 19 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मराठी भाषेला ‘माय मराठी’ संबोधले जाते. या विषयात सर्वाधिक कारवाई होत असल्याने सध्याच्या शिक्षण पध्दतीचे दर्शन होते.

कारवाई झालेल्यांची विषयनिहाय संख्या
जिल्ह्याभरातील एकुण 66 विद्यार्थ्यांवर परिक्षेदरम्यान अनुचित प्रकार आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे. एकही विषयाला कारवाई झाली नाही असे घडलेच नाही. यात दहावीच्या मराठी विषयात 13, हिंदी 2, इंग्रजी 19, बिजगणीत 8, भुमिती 1, विज्ञान एक 1, विज्ञान 2 असे एकुण 46 विद्यार्थ्यांवर तर बारावीच्या मराठी 6, इंग्रजी 2, भौतिकशास्त्र 3, गणित 2, रसायनशास्त्र 2, इतिहास 3 असे एकुण 20 विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

शाळा व अधिकार्‍यांवर कारवाई शुन्य
जिल्ह्याभरात कॉफीमुक्त अभियान राबविण्याचा संकल्प करण्यात आला. शाळा महाविद्यालयांमध्ये कॉफीमुक्तीसाठी शपथ घेण्यात आली. परंतु केवळ प्रसिध्दीसाठीच शपथविधीची औपचारीकता केल्याचे आतापर्यत झालेल्या कारवाईतुन दिसून आली आहे. जिल्ह्याभरात पथक असतांनाही कारवाई झालीच. सर्रासपणे कॉफी करतांना आढळल्याने शाळांवर व कॉपीमुक्त अभियान राबविण्याकरीता जबाबदार असलेल्या अधिकारींवर अद्यापही काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. तालुकानिहाय पथके नेमण्यात आली होती. ही पथके परीक्षे दरम्यान सतत धडक देत होती.