कॉपीमुक्त परीक्षेसह शिक्षणाचा दर्जा राखण्याचा प्रयत्न

0

दिलीप रामू पाटील : दे.ना.भोळे महाविद्यालयात जागतिक तापमानामुळे वातावरणावर होणारा परीणाम-जाणीव जागृती कार्यशाळा

भुसावळ- विद्यापीठाची भूमिका कॉपीमुक्त परीक्षा घेणे, शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न करणे ही असून विद्यापीठात विद्यार्थी विकास योजनेंतर्गत 42 योजना राबविण्यात येत असून निसर्गातून मिळणार्‍या मुबलक वस्तूचा योग्य वापर करणे आवश्यक आहे, असे मत जळगाव विद्यापीठाचे व्यवस्थापन परीषद सदस्य दिलीप रामू पाटील यांनी येथे व्यक्त केले. दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात रौप्य महोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळी 10 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव व विद्यार्थी कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तापमानामुळे वातावरणावर होणारा परिणाम- जाणीव जागृती या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, अधिसभा सदस्य प्रा ई.जी.नेहेते, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण उपस्थित होते.

महाविद्यालयीन संस्कार आयुष्यभर पुरतात
दिलीप रामू पाटील म्हणाले की, चांगल्या गोष्टी करण्याची सवय याच वयात लागली पाहिजे, व्यक्तिगत जीवनात चांगले वाईट नियम ठरवून घ्या. चांगले चॅलेंज स्वीकारले पाहिजे, महाविद्यालयीन संस्कार आयुष्य भर पुरतात तसेच तापमानावर विचार करतांना वृक्षारोपण व पाऊस यावर संशोधन आवश्यक आहे त्याशिवाय पर्याय नाही आपण समाजास देणे लागतो याचा विचार करावा, असे ते म्हणाले.

ओझोन लेयर कमी झाल्याने वाढले तापमान -प्राचार्य
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक म्हणाले की, तापमान व प्रदूषण वाढीचे मुख्यकारण म्हणजे ओझोन लेयर कमी होणे आहे त्यासाठी जबाबदार असलेले घटक म्हणजे थर्मल पॉवर स्टेशन, पेट्रोल-डिझेल गाड्यांचे धूर, शहराचे आद्योगिकरणामुळे होणारे प्रदूषण, घनकचरा, जलप्रदूषण इ. यावर उपाय म्हणजे इलेक्ट्रिक, सौरऊर्जा, बॅटरी, सीएनजी गाड्यांचा वापर वाढवावा, विद्युत निर्माण करण्यासाठी हैड्रो व सौर, ऊर्जेचा वापर वाढवावा तसेच मोकळ्या जागेत झाडाचे वृक्षारोपण करावे, तळे तयार करावे, पाणी आडवा पाणी जिरवा असे उपक्रम राबवावे, असे आवाहन प्राचार्यांनी केले.

दोन सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
प्रथम सत्रात प्रा.ई.जी.नेहेते तर व्दितीय सत्रात प्रा.डॉ.ए.एन.सोनार यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत भुसावळ परीसरातील यावल, फैजपूर, रावेर, भलोद, ऐनपूर, वरणगाव, बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर, भुसावळ या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिर्नी उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रा.डॉ.जे.पी.वाघूळदे तर सूत्र संचालन डॉ.दयाघन राणे, प्रा श्रेया चौधरी, प्रा माधुरी पाटील तसेच आभार प्रा.अनिल सावळे यांनी मानले.

यांनी घेतले परीश्रम
यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.जी.पी.वाघूळदे, प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.शोभा चौधरी, प्रा.डॉ.भारती बेंडाळे, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.अनिल सावळे, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.आर.एम.सरोदे, प्रा.अनिल नेमाडे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.तबरेज खान, प्रा.रोहित तुरकेले, प्रा.गिरीश सरोदे, प्रा.दीपक जैस्वावल, सुधाकर चौधरी, प्रकाश चौधरी, प्रकाश सावळे, सुनील ठोसर, दीपक महाजन, राजेश पाटील, हर्षवर्धन बाविस्कर व इतर शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतल्याचे प्रसिद्धीप्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.