जळगाव । दहावीचे बोर्डाचे पेपर सध्या शहरातील महाविद्यालया मध्ये सुरु आहे. माय मराठी ला कोप्याचा सुळसुळाट असा रिपोर्ट दैनिक जनशक्तीने मराठी चा पेपर 7 मार्च रोजी लावला होता. पोलिसांनी कॉपी फोडणार्या व पुरवणार्या बहाद्दरावर कार्यवाही करण्यात आली होती. मात्र तरी सुद्धा पोलिसांच्या कार्यवाहीला न जुमानता महाविद्यालया मध्ये कॉपी पुरवण्यात येत आहे. पोलिसांच्या कार्यवाहीचा धाक नसलेल्यावर गुन्हे दाखल करावे आता अशी चर्चा जळगाव शहरात आहे. बोर्डाचे पेपर असताना कोप्या पुरवणार्या मुळे विद्यार्थ्याचे भवितव्य धोक्यात आले आहे. मराठी चा पेपर मुंबई सह जळगाव मध्ये फोडण्यात आला तो सोशल मिडीयावर पसरवण्याचा प्रयत्न देखील झाला आहे. या साठी जिल्हा प्रशासन सक्रीय झालायस अनधिकृत चालणार्या कारभाराला आळा बसणार आहे.
आणि कॉपी बहाद्दरांनी ठोकली धूम
कॉपी बहाद्दराची मनमानी शहरात सुरु असताना त्यांना धाक मात्र फक्त वृत्तपत्राच्या छायाचित्रकाराचा राहिलेला दिसून येतो आहे. कॉपी पुरवणार्या च्या मागे पोलीस लागत एखाद्या चोराला पकडण्यासारखे किस्से शहरात घडत आहेत. तरी सुद्धा पोलीसा देखत कोप्या पुरवल्या जातात या मुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वृत्तपत्राच्या छायाचित्र काढणार्या प्रतिनिधीला बघताच कॉपी बहाद्दर धूम ठोकत आहे. शिक्षण विभागाच्या वतीने कार्यवाही सुरु असताना अशा घटना जळगाव मध्ये घडत आहेत. मात्र भरारी पथक जळगाव शहरात लक्ष ठेऊन असताना एकाही कोप्या करणार्यावर कार्यवाही झालेली दिसून येत नाही.
आता पर्यत 24 डिबार
जिल्ह्यात ग्रामीण भागात भरारी पथक मोठ्या जोमाने कार्यवाही साठी मागे लागले आहेत. 9 मार्च रोजी झालेल्या हिंदी च्या बोर्डाच्या परीक्षेला लाठी हायस्कूल भोकर येथे दोन जणांना डिबार करण्यात आल्याची घटना घडलेली आहे. जिल्ह्यात एकून 24 जणांना माध्यमिक शिक्षण विभागाच्या पथकाने आता पर्यत डिबार केले आहे. ग्रामीण भागात कार्यवाही चा धडाका भरारी पथकाने आता पर्यत लावला आहे. बारावी बोर्डाचे नऊ तर दहावी बोर्डाचे एकून 15 विद्यार्थ्यांवर डिबार ची कार्यवाही करण्यात आली आहे.
गुन्हे दाखल होणार
पोलिसांनी महाविद्यालय परीक्षा केंद्रांना मोठा बंदोबस्ताचा वेढा लावला लावण्यात आला असताना कॉपी बहाद्दर कोप्या पुरवताना दिसून येतात. ग्रामीण भागात माध्यमिक शिक्षण विभागाचे भरारी पथक सक्रीय असताना शहरी भागात देखील कॉपी मुक्त अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या पुढे कोप्या करताना किवा पुरविताना आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने कठोर पावले उचलली आहे.
कॉपी बहाद्दरांना लगाम!
बारावीच्या परीक्षेनंतर दहावीच्या विद्यार्थ्याच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याभरात एकून 127 केंद्रांवर 64 हजार 487 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. कॉपी प्रकारास प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात 15 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आल्याने कॉपी बहाद्दराचे धाबे दणाणले आहे. या मुळे कॉपी करणार्या विद्यार्थ्यांना एक प्रकारे लगाम मागणार आहे. परीक्षेत गैरप्रकार करणार्या विद्यार्थ्यांवर डीबारची कारवाई कॉपीप्रकरणी मदत करणार्या कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यातील वादग्रस्त असलेल्या केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. आता ग्रामीण भागासारखेच शहरी भागातही कॉपी बहाद्दरांचा सुरु असलेला मनमानी कारभाराला लगाम लागणार आहे.