वॉशिंग्टन – कॉफी पिऊन तरतरी येते इतकीच तिची उपयुक्तता सर्वांना माहित असते पण हीच कॉफी दीर्घायुष्य देणारी आहे असे संशोधनांमधून पुढे आले आहे. एक संशोधन अमेरिकेत तर दुसरे युरोपात झाले असले तरी कॉफीबद्दल त्यांचा
निष्कर्ष सारखाच आहे तो म्हणजे कॉफी जीवनदायीनी आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार रोज एक कप कॉफी पितो तो १६ वर्षांच्या कालावधीत मरणे अशक्य असते. जास्त कप कॉफी रिचवाल तेवढी मरणाची शक्यता कमी. एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन या जर्नलमध्ये कॉफीचा महिमा सांगितला आहे.
या संशोधनात दोन लाख १५ हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यात आफ्रिकन, जपानी, लॅटीन. कॉकेशियन आदींचा समावेश होता. त्यांनी आपल्या खाण्यापिण्याचा तपशील भरून दिला होता.
कॉफी पिणाऱ्यांना न पिणाऱ्यांपेक्षा मृत्युचा धोका कमी होता असे शास्त्रज्ञांना आढळले. कॉफीत असे काय आगे की जे मृत्युची संभाव्यता कमी करते. शास्त्रज्ञ सांगतात की कॉफीत अँटी ऑक्सिडंट आणि सूज प्रतिबंध गुणधर्म असतात त्याचा फायदा शारीरिक प्रक्रीयांना व शरीराच्या भागांना होतो. एकंदरच कॉफी मृत्युंजय पेय ठरले आहे आणि तसा निर्वाळा शास्त्रकारांनी नव्हे तर शास्त्रज्ञांनी दिला आहे.