मुंबई : करिना आणि प्रियांकाची जोडी ‘डॉन’ आणि ‘ऐतराज’ चित्रपटांमध्ये एकत्र झळकली होती आणि प्रेक्षकांची भरपूर पसंतीही मिळाली. रिअल लाईफमध्ये बहुतेकदा या दोघींच्याही कॅट फाईट अधिक चर्चेत राहिल्या. सतत एकमेकींनी टोमणे देणाऱ्या या दोघी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहेत. कॉफी विथ करणच्या एका भागासाठी या दोघी एकत्र येणार असल्याचे समजले आहे.
मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान करिनाने प्रियांकाचे भरपूर कौतुक केले होते. आता अशात या दोघीही या चॅट शोमध्ये एकत्र येणे चाहत्यांसाठी अधिक खास ठरणार आहे.