‘कॉफी विथ करण’मध्ये जान्हवीने केला ईशानसोबतच्या नात्याचा खुलासा

0

मुंबई : करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये नुकतेच सैफ अली खान आणि त्याची मुलगी सारा अली खान यांनी शोमध्ये हजेरी लावली. त्यानंतर एक नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.

या प्रोमोमध्ये अर्जुन कपूर आणि बहिण जान्हवी कपूर एकत्र दिसत आहेत. काहीच सेकंदाच्या व्हिडिओत दिसतेय की दोघे बहिण-भाऊ एकमेकांचे मजेशीर किस्से शेअर करणार आहेत.

तेव्हा करण जोहर जान्हवीला विचारतो, तू ईशान खट्टरला डेट करत आहेस का? यावर जान्हवी हसून उत्तर देते की नाही. यावर करण अर्जुनला मत विचारतो तेव्हा तो म्हणातो, माहित नाही पण तो नेहमी जान्हवीच्या जवळ फिरकताना दिसतो असतो.