‘कॉमन बर्ड मॉनेटरिंग प्रोग्रॅम’तर्फे सुगरण पक्ष्याच्या गणनेस सुरवात

0

जळगाव : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई द्वारा सुगरण पक्षी गणना, 10 ते 24 जुन 2018 दरम्यान राबविण्यात येत आहे सावखेडा परिसरात सुगरण पक्ष्याची गणना सुरु करण्यात आल्याची माहिती पक्षिमित्र शिल्पाव राजेंद्र गाडगीळ यांनी दिली. या गणनेत 152 सुगरण पक्ष्यांची नोंद करण्यात आली.नारळाच्या ,बाभळीच्या व शिंदीच्या झाडांवर नर सुगरण घरटी विणातांना आढळले. या पक्ष्यांची लांबी साधारणतः 15 से.मी इतकी असते. विणीच्या हंगामात नर हा छातीपर्यंत पिवळाधमक होतो आणि पाठीवर पिवळ्या रेषा हि नर पक्ष्यांची ओळख. इतर काळात नर तसेच मादी चिमणी सारखे दिसतात.

सुगरणची घरटे विणण्याची लगबग
सुगरण सुंदर पद्धतीने घरटे विणतो. मान्सून चे आगमन होण्याच्या काळात यांची घरटे करण्यासाठी लगबग सुरु होते. यावेळी ते एकत्रपणे येतात. अश्या वेळी त्यांची गणना करणे सहज शक्य होते असल्याचे सांगून या गणनेत सामील होण्याचे आवाहन कॉमन बर्ड मॉनेटरिंग प्रोग्राम चे जिल्हा समन्वयक पक्षिमित्र राजेंद्र गाडगीळ व शिल्पा गाडगीळ यांनी केले आहे.

शास्त्रीय माहिती संकलन
सुगरण पक्ष्यांच्या गणनेमुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून भरपूर माहिती गोळा मदत होणार असून त्यामुळे त्यांच्या संख्येत वाढ होत आहे की कमी होत आहे. हे बदल नोंदविण्यासाठी मदत होणार आहे. ही शास्त्रीय माहिती गोळा होण्याने पक्ष्यांच्या संवर्धनासाठी त्याचा उपयोगात होणार असल्याचे पक्षिमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ म्हणाले.

नागरिकांना गणनेत सहभागाचे आवाहन
देशभरात सुरू असलेल्रा सुगरण पक्षी गणनेत पक्षीमित्रांनी तसेच नागरिकांनी सिटीझन सैन्तिटीस्ट म्हणून सहभाग घ्यावा असे आवाहन पक्षिमित्र राजेंद्र व शिल्पा गाडगीळ करीत आहेत. शहर व जिल्हा क्षेत्रातील पर्रावरणवादी व पक्ष निरीक्षणाचा धंद असणार्‍रांनी सुगरण पक्ष्याच्या गणनेत सहभाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी 9423973115 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.