कॉमेडीचा किंग आणि कॉमेडीची क्वीन पुन्हा दिसणार एकत्र

0

मुंबई : कॉमेडीची क्वीन भारती सिंग आणि कॉमेडीचा किंग कपिल शर्मा यांनी बऱ्याच वेळा एकत्र काम केलं आहे. आता ‘द कपिल शर्मा शो’ च्या नवीन सीजनमध्ये भरतीही दिसणार आहे. या नव्या शोमध्ये भारती ‘तितली यादव’ ही व्यक्तीरेखा साकारणार आहे.

भारती म्हणाली, ”माझ्यासाठी ही प्रतीक्षा प्रेक्षकांहून जास्त होती. जेव्हा शो बंद होणार असल्याच्या  बातम्या पसरु लागल्या तेव्हा मी कपिलला फोन करुन धीर दिला होता. लोक काय विचार करतात यामुळे काही फरक पडत नाही, तुम्ही कसे आहात ते मला माहिती आहे.” ”मी त्याला सांगितले की मला तुझ्यासोबत काम करायचे आहे आणि त्यावर तो म्हणाला, पुन्हा जेव्हा परत येईन तेव्हा कृष्णा आणि तुझ्यासोबत काम करेन,” असेही भारती म्हणाली.