जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : भुसावळातील गुन्ह्याचा उलगडा
जळगाव- मोबाईलवर कॉल लावू देण्याचा बहाणा करीत मोबाईल लांबवण्याच्या घटना जिल्हाभरात वाढल्या होत्या तर भुसावळातील प्रतीक चंद्रशेखर सोनवणे (19, हनुमानगर, भुसावळ) यांचादेखील मोबाईल अशाच पद्धत्तीने 27 जुलै रोजी लांबवण्यात आल्याने बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल होता. या प्रकरणी जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील, रवी पाटील, विनोद पाटील, अनिल देशमुख, युनूस शेख, विजय पाटील, नरेंद्र वारूळे, दिनेश बडगुजर, सचिन महाजन, दर्शन ढाकणे यांनी गुप्त माहितीवरून आरोपी शेख जफर शेख रफिक (26, ईस्लामपूरा, नवी मशिदीजवळ, जामनेर) यास अटक केली. आरोपीच्या ताब्यातून नऊ मोबाईल जप्त करण्यात आले.