कोंगानगर येथील ग्रामस्थ दोन महिन्यापासून रेशन मालापासून वंचित

0

चाळीसगाव । तालुक्यातील कोंगानगर येथील ग्रामस्थांना रेशन माल फेब्रुवारी व मार्च महिन्याचा मिळाला नसून सदर दुकानदार उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी कोंगानगरचे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी तहसीलदार चाळीसगाव यांचेकडे तक्रारी अर्जाद्वारे केली आहे. कोंगानगर ता चाळीसगाव येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी तहसीलदार चाळीसगाव यांच्याकडे केलेल्या दि 24 मार्च 2017 रोजी लेखी तक्रारीत म्हटले आहे कि कोंगानगर ता चाळीसगाव येथे फेब्रुवारी व मार्च 2017 या दोन महिन्यांचे रेशन ग्रामस्थांना वितरित झाले नाही. शासन मान्य रेशन मालाचे दुकान मालक हे शासकीय गोडाऊन मधून रेशन मालाची उचल करतात. रेशन कार्ड धारक गहू, तांदूळ व रॉकेल घेण्यासाठी 2 महिन्या पासून दुकानावर जातात त्यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात. फेब्रुवारी व मार्च महिन्याचा माल मिळाला नाही असे सांगून त्या मालाची विक्री करीत नाही या प्रकरणाची चौकशी होऊन सदर दुकानदारांवर कारवाई करावी असे शेवटी म्हंटले आहे. तक्रारी अर्जावर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.