कोंडवाडा गल्लीतील शाळा तालुक्यात अव्वल

0

पाचोरा । येथील कोंडवाडा गल्ली परीसरात असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक 12 वीचा निकाल शहरासह तालुक्यातील शाळांमध्ये प्रथम असून यावर्षी 117 पैकी 105 विद्यार्थींनी उत्तीर्ण झालेल्या आहे. शाळेचा एकुण निकाल 90 टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक अश्विनी रमेश मोरे (75 टक्के), द्वितीय क्रमांक कु. दिपाली रामराव गायकवाड (72 टक्के) तृतीय क्रमांक ललिता आकाश पाटील (71 टक्के)यांना मिळाला आहे. विशेष प्रावीण्यात 6 तर प्रथम श्रेणीमध्ये 72 व द्वितीय श्रेणीत 27 विद्यार्थीनी उत्तीर्ण झालेल्या आहे. यशस्वीबद्दल संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील पवार, सचिव रुपालीताई जाधव, प्रशासकीय अधिकारी सचिन सोमवंशी, प्राचार्य संजय पवार यांनी केले आहे.