कोंडाईबारी घाटात अपघातात एकाचा मृत्यू

0

साक्री। सुरत-नागपूर महामार्गावर कोंडाईबारी घाटात दोन मोटारसायकलींची धडक होऊन एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा धडक देणारा अज्ञात मोटारसायकलस्वार मात्र फरार झाला आहे. अपघाताची दखल दहिवेल आऊटपोस्ट पोलिसांनी घेतली आहे.

इम्रानशहा राजूशहा फकीर (वय 34, रा. आदर्शनगर, साक्री) याने दिलेल्या फिर्यादीनुसार अकबरशहा राजूशहा फकीर (वय 33, रा. आदर्शनगर, साक्री) हा त्याची मोटरसायकल (एम.एच. 15/ए.टी. 4100 ) घेऊन दहिवेलकडे येत होता. दुसरा मोटारसायकलस्वार (क्र.एम.एच.18/ए.क्यू.6898) ही घेऊन दहिवेलकडून नवापुरकडे जात होता. त्यावेळी दोघांची समोरासमोर धडक झाली. त्या अपघातात अकबर शहा याचा मृत्यू झाला. धडक देणारा अज्ञात दुचाकीचालक फरार झाला आहे. अधिक तपास पो.हे.कॉ. पाटील करीत आहेत.