पोलीस अधिकारी गायकवाड यांची बदली रद्द करण्याची मागणी
हडपसर : भाजप सत्ताधार्यांच्या दबावाखाली कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची बदली केल्याच्या निषेधार्थ शिवसेना हडपसर विधानसभा व पुणे शहरच्या वतीने कोंढवा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. शिवसेना शहर प्रमुख माजी आमदार महादेव बाबर व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये नगरसेवक अजय भोसले, नाना भानगिरे, संगीता ठोसर, वैष्णवी घुले तानाजी लोणकर, भरत चौधरी, नीता भोसले, वत्सला घुले, , उपशहरप्रमुख समीर तुपे, संतोष भानगिरे अभिमन्यू भानगिरे आदी उपस्थित होते.
भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या विरोधात नुकताच खंडणीचा गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा मिलिंद गायकवाड यांनी दाखल केल्याने त्यांची बदली केल्याचा निषेध यावेळी नोंदविण्यात आला. मिलिंद गायकवाड सारख्या कार्यक्षम अधिकार्यांना पुन्हा रुजू करावे व पोलिसांचे मनोधैर्य खचणार नाही यासाठी शासनाने प्रयत्न करावे, अशी आग्रही भूमिका यावेळी बाबर यांनी मांडली. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करून निवेदन देण्यात आले.