पुणे : कोंढव्याच्या परिसरातून पुण्यातील बॉम्बस्फोटांच्या घटनांशी संबंधित लोक पकडण्यात आले होते. हे लक्षात घेता महापालिकेने प्रस्तावित केलेले हज हाउस येथे उभारू नये. सुरक्षेच्या दृष्टीनेही हे अयोग्य असून धार्मिक स्वरुपाच्या बांधकामासाठी महापालिकेचा निधी वापरणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे हज हाऊसचा प्रस्ताव रद्द न झाल्यास व्यापक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी सर्व हिंदू संघटनांच्यावतीने पत्रकार परिषदेत दिला.
समस्त हिंदू आघाडीसह वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदाय युवा मंच, विश्व हिंदू महासंघ, हिंदू जनजागृती समिती, शिवसमर्थ प्रतिष्ठान, पतित पावन संघटना, विश्व हिंदू परिषद यांसह अनेक संघटनांनी प्रस्तावित हज हाउसला विरोध दर्शविला आहे. वेळप्रसंगी सर्व संघटना एकत्रितपणे याविरोधात रस्त्यावर उतरतील, असा इशाराही यावेळी दिला.