कोकडी तांडा येथे कर्जबाजारी शेतकयाची आत्महत्या

0

पाचोरा । तालुक्यातील अंबेवडगाव येथून जवळच असलेल्या कोकडी तांडा येथील अल्पभूधारक शेतकरी युवराज रोहीदास जाधव वय अंदाजे (26) वर्ष याने आज सकाळी अकरा वाजेचे सुमारास स्वताचे शेतात निंबाचे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळुन आले.

या घटनेबाबत कोकडी तांडा येथील पोलीस पाटील शेषराव राठोड यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला खबर दिली या घटनेची माहीती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संदिप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. वाघ व पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी येऊन रीतसर पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणी कामी पाचोरा न.पा.दवाखान्यात पाठविण्यात आले. कर्जबाजारीला वैतागुन आत्महत्या केल्याचे जनतेतुन बोलले जात आहे. तसेच पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी कोकडी तांडा येथे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटूंबियांची भेट घेऊन अधिक चौकशी केली.