कोकणस्थ कुंभार समाजाचा मेळावा

0

नेहरुनगर: येथील शिवशंभो मंगल कार्यालयात कोकणस्थ कुंभार समाजाचा स्नेहमेळावा झाला. यामध्ये समाजातील जेष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थी तसेच इतरही उल्लेखनिय काम करणार्‍या व्यक्तींचा आमदार महेश लांडगे व माजी महापौर हनुमंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. या मेळाव्याला नगरसेवक राहुल भोसले,कुंभार समाज संघाचे विभागीय अध्यक्ष महेश सायकर, सत्यवान साळवी, प्रकाश शिवणकर, मदण नरवणकर, आनंद साळवी व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

समाजाच्या पाठिशी : आमदार लांडगे
यावेळी आमदार लांडगे म्हणाले, समाज एकत्रीत असल्यास मोठया प्रमाणात समाजाचा विकास होत असतो. अशा स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून समाजाच्या अनेक अडचणी व समस्या पुढे येऊन सुटण्यास मदत होऊन समाजाची एकजुट कायम राहण्यास मदत होते. कुंभार समाजाच्या विवीध अडचणी सोडविण्यासाठी मी बांधील असून त्यांच्या विकास कार्यास माझा निश्चितच हातभार असेल. कार्यक्रमाचे अध्यक्ष हनुमंत भोसले म्हणाले, कुंभार समाज शिस्त व शांतप्रिय म्हणुन शहरात ओळखला जातो. आपल्या कष्टाच्या जोरावर अनेक कुंटूंबाने दैद्यमान यश सर्वच क्षेत्रात संपादन केले आहे, ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बजरंग साळवी,अरुण साळवी, राजेंद्र साळवी, दिनेश शिवणकर, अजय साळवी, अनिल साळवी यांनी प्रयत्न केले तर सुत्रसंचालन अमोल निवळकर आणि महेश गुडेकर यांनी कले.