कोकण रेल्वेच्या 250 जादा फेर्‍या

0

अलिबाग । कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे बुकींग 24 तासात हाऊलफुल झाल्यानंतर 250 ज्यादा फेर्‍या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून नियमित आणि ज्यादा प्रवासी धरून 5 लाख प्रवासी प्रवास करतील एवढी या गाड्यांची क्षमता असणार आहे. दादर-रोहा, पनवेल-चिपळूण, दादर-रत्नागिरी, सिएसटी-मढगाव, दिवा-सावंतवाडी या मार्गावरून ज्यादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच बरोबर पुणे-मढगाव, वसई-सावंतवाडी, बोरीवली-मढगाव, मुंबई सेंन्ट्रल- मढगाव, पुणे-मढगाव, अशा विविध मार्गावरून या रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहेत. ज्यादा ट्रेनमुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर गणपतीसाठी जाणार्‍या चाकर माण्यांच्या सोयीसाठी 01185 हि दादर-रत्नागिरी गणपती स्पेशल सोडण्यात येणार आहे.

दादर-रत्नागिरी खास गाडी
01185 दादर-रत्नागिरी आणि 01186 रत्नागिरी-दादर अशी हि रेल्वेची स्पेशल गाडी असणार आहे. हि गाडी गणेशोत्सव काळात 23 ते 5 ऑगस्ट दरम्यान धावणार आहे. यापुर्वी रेल्वेने 200 पेक्षा जास्त फेर्‍या गणेशोत्सव काळात सुरु केल्या असून सावंतवाडी वेलकन्नी 00107 आणि 00109 पनवेल – चिपळूण स्पेसल ज्यादा गाडी 00108 याबरोबरच वसई – मढगाव, बोरीवली – मढगाव अशा गाड्यांची हि घोषणा केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या निर्देशानुसार कोकण रेल्वे मार्गावर ज्यादा रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. कोकण मार्गावरील ज्यादा सोडलेल्या आणि नेहमीच जाणार्‍या रेल्वे मधून जवळपास 5 लाकापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करु शकतील अशी सोय रेल्वे प्रशासनाने केली आहे.