जळगाव । मक्तेदारास तीन वर्षासाठी चालविण्यास दिलेल्या मनपाच्या मालकीचा कै. राजाराम आत्माराम कोकीळ गुरुजी जलतरण तलावात अशुध्द पाणी व नादुरुस्त फिल्टर प्लँटमुळे सभासदांच्या तक्रारी वाढल्या होत्या. सभासदांच्या तक्रारी असतांनाच 8 अक्टोंबर 2015 रोजी या मक्तेदाराने या जलतरण तलावास कुलुप ठोकले होते. फिल्टर प्लँटची दुरुस्तीची मागणी करुनही प्रशासन त्यावर कारवाई करीत नसल्याने वर्षापूर्वीच करारनामा संपुष्टात आणत असल्याचे मक्तदोराने सांगीतले होते. प्रशासनाने देखील मक्तेदारावर कारवाईसाठी विधी शाखेकडून प्रकीया सुरु केली होती. या वादात तलाव आजपर्यंत बंदच आहे.
तलतरण हस्तातरणांची प्रक्रियेस सुरुवात
तो सुरू करण्यासाठी संस्थेची व मक्तेदाराची शोध घेतला जात होता. त्यानुसार एसजीएन कन्सट्रॅक्शनला जलतरणतलाव सुरू करण्याची परवानगी देवून हस्तांतर करण्याची प्रक्रियेला आज सुरवात केली. 30 वर्षाच्या मुदतीवर चालविण्यासाठी दिला जाणार असून यात सुसज्ज अशा सुविधा असणार आहे अशी माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी बुधवारी दिली. महापालिकेचा कोकीळ गुरुजी जलतरण तलाव गेल्या दोन-तीन वर्षापासून बंद अवस्थेत होता. हा तलाव सुरू करण्यासाठी मनपातर्फे संस्थेची व मक्तेदाराचा शोध घेतला जात होता.
6 ते 8 महिन्यात तलावाचे नूतनीकरण
महापालिकेने एसजीएन कन्स्ट्रक्शन यांना 30 वर्षाच्या करारावर चालविण्यासाठी दिला आहे. त्यानुसार महापालिकेस मक्तेदाराकडून दरवर्षी 2 लाख 51 हजार उत्पन्न मिळणार आहे. तर दोन-दोन वर्षानंतर उत्पन्नात दोन टक्यांनी वाढ होणार आहे. जलतरण तलावाचे पूर्ण नूतनीकरण केला जाणार असून सुसज्ज पद्धतीने हा जलतरण तलाव तयार करण्यासाठी मक्तेदार जवळपास 1 कोटी रुपये खर्च करणार आहे. 6 ते 8 महिन्यात या तलावाचे नूतनीकरण करून सर्वांसाठी खुला केला जाणार आहे.
जलतरण तलावात सुविधायुक्त
जलतरण तलावा परिसरात योगा, पार्टी लॉन, झुंबा डॉन्स, केरळी थेरपी, स्टिम बाथ, सोना बॉथ तसेच, लहान मुलांसाठी पुलाची व्यवस्था केली जाणार आहे. जलतरण तलावाचा सर्व परिसर नविन पध्दतीने विकसीत केला जाणार आहे. पाणी फिल्टर प्लॅन्ट देखील नवीन बसविला जाणार असून हा प्लॅन्ट 8 तासात 30 लाख लिटर पाणी शुध्द करण्याची क्षमता असणार आहे.
सशुल्क सुविधा मिळणार
कोकीळ गुरुजी जलतरण तलावामध्ये पूर्वी आजीवन सभासद, मोफत सुविधा होती. परंतू यामुळे यापूर्वीच्या मक्तेदारास नुकसान झाल्याने अर्ध्यातच जलतरण तलाव सोडून गेला होता. त्यामुळे मनपाने 19 जानेवारी 2016 च्या महासभेत ठराव क्रमांक 374 चा आजीवन सभासद, मोफत सुविधा रद्द केली होती. त्यामुळे नवीन होणारा हा जलतरण तलावात कोणालाच मोफत सुविधा मिळणार नाही.