कोकीळ गुरूजी जलतरण तलाव दुरूस्तीची निविदा मंजूर

0

जळगाव। मक्तेदारास तीन वर्षासाठी चालविण्यास दिलेल्या महापालिकेच्या मालकीचा कै. राजाराम आत्माराम कोकीळ गुरुजी जलतरण तलावात अशुध्द पाणी व नादुरुस्त फिल्टर (शुध्दीकरण) प्लँटमुळे सभासदांच्या तक्रारी वाढल्या होत्या. सभासदांच्या तक्रारी असतांनाच 8 अक्टोंबर 2015 रोजी या मक्तेदाराने या जलतरण तलावास कुलुप ठोकले होते. फिल्टर प्लँटची दुरुस्तीची मागणी करुनही महापालिका प्रशासन त्यावर कारवाई करीत नसल्याने 1 वर्ष अगोदर करारनामा संपुष्टात आणत असल्याचे मक्तदोराने महापालिका प्रशासनाला सांगीतले.

जलतरण तलाव लवकरच सुरू होणार
प्रशासनाने देखील मक्तेदारावर कारवाईसाठी विधी शाखेकडून प्रकीया सुरु केली होती. या वादात जलतरण तलाव मात्र तेव्हापासून आजपर्यंत बंदच आहे. महापालिकेचा बंद असलेला जलतरण तलाव स्वंयसेवी संस्थेस 10 वर्षे चालविण्यासाठी देण्याचा प्रस्ताव करण्यात आला. त्यानतंर एसजीएन कन्ट्रक्शनची निविदा मंजूर करण्यात आली. त्यांना लगेचच कार्यादेश देण्यात येणार असून दुरुस्तीच्या कामास सुरुवात होणार असल्याची माहीती महापौर नितिन लढ्ढा यांनी दिली.

दुरूस्तीला 50 लाखांचा निधी
अखेर महालिपालिकेने तलावाची संपूर्ण दुरुस्ती करुन तो मेन्टेन करुन चालविण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार एसजीएन कन्ट्रक्शनने वार्षिक 2 लाख 51 हजार महापालिकेला देण्याची मान्यता दिल्याने त्यांची निविदा मंजूर करण्यात आली. जलतरण तलावाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 50 लाख रुपये खर्च येणार आहे. दुरुस्तीचे काम 6 महिने चालणार असून त्यानंतर जलतरण तलाव खुला करण्यात येणार असल्याची माहीती मनपाने दिली आहे.