भुसावळ । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे एप्रिल 2017 मध्ये झालेल्या विविध वर्गांच्या परिक्षाचे निकाल जाहीर झाले आहेत. एम.ए. हिंदीच्या निकालात महाविद्यालयाने 86 टक्के तर एम.ए. इंग्रजीचा निकाल 83 टक्के लावून उत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे. एम.ए. हिंदी विषयात महाविद्यालयात लक्ष्मी मधुकर तायडे या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकावला, तर दुर्गेश्वरी मोहन बोहरे द्वितीय व तृतीय क्रमांक मीना लासकारार हि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. एम.ए. इंग्रजी विषयात महाविद्यालयातून प्रतिभा विश्वनाथ वाणी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तसेच गेडाम शिखा रामभाऊ व मनिषा रामकृष्ण व्ही. यांनी द्वितीय व तृतीय रेखा वसंत पाटील ही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. संस्थाध्यक्षा पद्मा कोटेचा, प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा, उपप्राचार्य प्रा. व्ही.एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. जे.एस. धांडे, उपप्राचार्य प्रा. जे.व्ही. धनवीज यांच्यातर्फे यशस्वी विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.