भुसावळ : येथील प.क. कोटेचा महिला महाविद्यालयातील हिंदी विभागात कार्यरत प्रा. गिरीश कोळी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे.
‘अनामिका जीवन और साहित्य’ या विषयावर प्रा. कोळी यांनी देवगाव रंगारी येथील डॉ.वसंतकुमार माळी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. शेतमजूरी करणार्या कुटुंबात जन्मलेल्या प्रा.कोळी यांनी आपल्या आईवडिलांच्या मेहनतीचे चीज करून त्यांच्या इच्छा-आकांक्षांची पूर्ती केली आहे. पीएच.डी. पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा पद्मा मोतीलाल कोटेचा, सचिव संजय सुराणा, प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा, उपप्राचार्य व्ही.एस. पाटील, डॉ. सोपान बोराटे, डॉ. मधू खराटे, डॉ.सुनिल कुळकर्णी, यांच्यासह इतरांनी स्वागत केले आहे.