भुसावळ । प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात महिला उद्योजकता कोर्स, कोटेचा महाविद्यालय व शुभम इन्फोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने ङ्गजीएसटी इन टॅलीफ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी टॅली चॅम्प, पुण्याचे सीईओ उज्वल शिंत्रे यांनी मार्गदर्शन केले. यात त्यांनी ‘वस्तू व सेवा कर’ टॅलीच्या माध्यमातून कशा पध्दतीने केले जातात याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. जीवन धांडे होते. कार्यक्रमात शुभम इन्फोटेकच्या संचालिका मृणाल पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागातील प्रा. एस.आय. महाजन, प्रा.डॉ. सुमित्रा पवार, प्रा. निता चोरडिया व इतर प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. महिला उद्योजकता कोर्सच्या समन्वय प्रा. राजकुवर गजरे यांनी आभार मानले. विद्यार्थिनींची उपस्थिती होती.