कोटेचा महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

0

भुसावळ। प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन रासेयो युनिटतर्फे रेड रीबन क्लब अंतर्गत करण्यात आले. यावेळी एड्स जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी उपप्राचार्य जे.व्ही. धनवीज होते. प्रमख वक्त म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.आर.पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. पाटील यांनी एड्सची व्याख्या, एचआयव्हीमधील फरक, कारणे, नियंत्रण यासारख्या मुद्यांवर मार्गदर्शन केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षीय भाषणात प्रा.जे.व्ही. धनवीज यांनी जीवनात विज्ञानाचे महत्व व विज्ञान मंडळाच्या उद्दीष्ठांवर प्रकाश टाकला. प्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ. संगीता पांढरे, डॉ. प्रभाकर चौधरी उपस्थित होते. सुत्रसंचालन निकीत पाचपांडे हिने तर प्रास्तविक प्रा.एम.एन. भुतडा यांनी तर आभार प्रा.एम.एस.चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राचार्या मंगला साबद्रा, उपप्राचार्य डॉ. जे.एस. धांडे, प्रा.डॉ. एच.पी. नारखेडे, प्रा.जे.व्ही. बोंडे, प्रा.जे.पी. तळेगावकर, प्रा.के.सी. सुर्यवंशी, प्रा.एस.बी. नुतनराव यांचे सहकार्य लाभले.