नवापूर । गावालगत रस्त्यावर उभे केलेले ट्रॅक्टर आणि मशागतीचे यंत्र चोरून नेणार्यास कोठडा येथे रंगेहाथ पकडण्यात आले. शैलेश बावा गावित (रा.कुकराण, ता.नवापूर) असे संशयिताचे नाव आहे. कोठडा गावाच्या बाहेर दोन लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर व 30 हजार रुपये किंमतीची शेत सपाटीकरणासाठी लागणारे यंत्र अर्थात सुपडी लावली होती. शैलेशने 28 रोजी अडीच वाजता ते चोरून नेण्याचा प्रयत्न केला. त्याचा सुगावा लागल्यावर तो रंगेहाथ सापडला.
याबाबत नवापूर पोलीस ठाण्याचे जमादार कृष्णा पवार यांनी फिर्याद दिल्याने शैलेश गावित याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास जमादार पवार करत आहे.