नवी दिल्ली: २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी असलेली साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर ऑक्टोबर २००८ ते एप्रिल २०१७ पर्यंत तुरुंगात होत्या. यादरम्यान नोव्हेंबर २००८ मध्ये एटीएस अधिकाऱ्यांनी कोठडीत तिचाच सहकारी भीम पसरिचा याला जबरदस्तीने साध्वीला मारण्यास भाग पाडले, असा आरोप साध्वीने केला आहे. मात्र यादरम्यान तिला दोनवेळा कोर्टात रिमांडसाठी हजर करण्यात आले होते, तेंव्हा तिने याबद्दल कोर्टाला काहीही सांगितले नाही. तसेच तिच्या वैद्यकीय चाचणीतही काही निष्पन्न झाले नव्हते.
सर्वोच्च न्यायालय आणि मानवाधिकार आरोग यापैकी कुठेही हा आरोप सिद्ध झालेला नाही. २०१५ मध्ये तर मानवाधिकार आयोगाने एटीएसला क्लीन चीट दिले आहे.