शहादा। कोठली ता. शहादा येथील प्रविण महाजन यांना दिल्ली येथे क्रांतीग्राम संस्थेतर्फे राष्ट्रीय विश्वनायक प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात आले. मुळचे कोठली ता. शहादा येथील प्रविण महाजन हे सध्या पुणे येथे स्थायीक झाले असून युवकमित्र या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.
या संस्थेमार्फत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये संगणक कक्ष, ग्रंथालये त्यांनी स्थापन केली आहेत याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना पुणे येथील सेवाभावी संस्थांच्या मदतीने शैक्षणिक साहित्य मिळवून देतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नेहरू युवा केंद्र सलग्न क्रांतीग्राम संस्थेतर्फे यंदाचा राष्ट्रीय विश्वनायक प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दिल्ली येथील माळणकर सभागृहात संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्यास मानव संसाधन व विकास विभागाचे अध्यक्ष सत्यनारायण जेटीया, भारताचे उच्चायुक्त न्यानेश्वर मुळे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सुरेश याधव औरंगाबाद विद्यापीठाचे प्रा. सुरेश गायकवाड़ आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते महारान यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.