येरवडा : कोठारी इंटरनॅशनल स्कूल शाळेचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम व वृक्षारोपण कार्यक्रमांनी याची सुरुवात झाली. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका सुमन पठारे, बाळासाहेब पठारे, पोलीस उपनिरीक्षक सांळुखे आदी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका पालक व शिक्षकांनी वृक्षारोपणात सहभाग नोंदविला.