कोठार आश्रम शाळेत विद्यार्थ्यांचे सामूहिक रक्षाबंधन

प्रतिनिधी तळोदा:–

कोठार ता.तळोदा येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत रक्षाबंधन सणानिमित्त विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सन उत्साहात साजरा केला.

यावेळी प्राथमिक शिक्षक हरी भारती यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाचे महत्व सांगितले.त्यानंतर विद्यार्थिनींनी शाळेतील विद्यार्थ्यांना ओवाळून राख्या बांधल्या. माध्यमिक शिक्षक जितेंद्र चौधरी यांनी रक्षाबंधनानिमित्त विविध गीतांचे सादरीकरण विद्यार्थ्यांसमोर करून दाखवले.यावेळी प्राथमिक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील माध्यमिक मुख्याध्यापक जयवंत मराठे भूषण येवले,मनोज चिंचोले, दीपक मालपुरे शालिग्राम वाणी, नीता गुरव,कविता पावरा, योगेश चव्हाण,जयेश कोळी, ब्रम्हराज नाईक, आदीसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.