जळगाव – ब्रेक द चेन अभियाना अंतर्गत गेल्या २ महिन्या पासून राज्यासह जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले होते.मात्र आज (१ जून) पासून यात काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली आहे.तरीही जळगाव शहरातील संकुलात व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीकांना दुकानं सुरु करायची कि नाही यात प्रचंड संभ्रम होता. मात्र मनात कोणताही संभ्रम न ठेवता नागरिकांनी संकुलातील दुकाने उघडावी असी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी जनशक्तीशी बोलताना दिली.ते असे म्हणाले कि, जळगाव शहरातील सर्वच संकुल उघडण्यासाठी आम्ही परवानगी दिली आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम न ठेवता व्यावसायिकांनी संकुलातील दुकाने उघडावी