कोणतेही शिक्षण घ्या पण योग्य माणूस व्हाः गुंजाळ

0

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे सत्कार समारंभ

लोणावळाः तुमच्यामध्ये काही तरी आहे ते खर्‍या अर्थाने समाजाला, जगाला दाखवून द्या. स्वतः काही केल्याशिवाय काही मिळणार नाही स्वतःवर विश्‍वास ठेऊन कराल तर ध्येयापर्यंत पोहचाल व हे सर्व करत असताना कोणतेही शिक्षण घ्या पण योग्य माणूस व्हा व जिद्द व चिकाटीच्या जोरावर कर्तुत्व करा, असे मत शिक्षण उपनिरिक्षक अनिल गुंजाळ यांनी तळेगाव येथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक गुणगौरव समारंभा कार्यक्रम प्रसंगी केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेच्यावतीने माध्यमिक शालांत परिक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त यशस्वी विद्यार्थी गुणगौरव समारंभ व 100 टक्के निकाल लावलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ तळेगाव दाभाडे येथे पार पडला. यावेळी माजी आमदार कृष्णराव भेगडे, मावळ सभापती गुलाबराव म्हाळस्कर, उपसभापती शांताराम कदम, तळेगाव नगरपालिका उपनगराध्याक्ष संग्राम काकडे, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग ठाकर, संघटना अध्यक्ष भाऊसाहेब आगळमे, कार्यवाह विशिष्ठ गटकुळ, कोषाध्यक्ष नारायण असवले, कार्याध्यक्ष भारत काळे, विलास भेगडे उपस्थित होते.

ध्येयापर्यंत पाहोचण्याचा प्रयत्न करावा
माजी आमदार कृष्णराव भेगडे विद्यार्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावा. यावेळी मावळ तालुक्यातील साठ माध्यमिक शाळेतील दहावीमध्ये उज्वल यश मिळवलेल्या व ज्या शाळांचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला त्या शाळेचा व मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटना धनंजय नांगरे, गणेश पाटील, रोहन पंडित, देवराम पारिठे, नामदेव गाभणे, रियाज तांबोळी, संजय हुलावळे, धनकुमार शिंदे, सोपान असवले, संजय वंजारी, चंद्रकांत धनवे, योगेश सोनवणे, अशोक कोराड, उमेश इंगुळकर यांच्यासह शिक्षक परिषेद सदस्यांनी केले.