कोणत्याही क्षणी कारवाईसाठी तयार रहा

0

नवी दिल्ली : वायुसेना प्रमुख बी.एस. धनोआ यांनी भारतीय वायुसेनेच्या सर्व अधिकार्‍यांना पत्र लिहून कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. या पत्रातून ’शॉर्ट नोटिसवर आपापल्या पोझिशनवरून कोणत्याही ऑपरेशनसाठी तयार राहण्याचे आदेश त्यांनी जवानांना दिले आहेत.सद्यस्थितीत परिस्थिती फारशी चांगली नाही. संकटे घिरट्या घालत आहेत. त्यामुळे शॉर्ट नोटिसवरच सर्व शक्तीनिशी कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी तयार राहावे लागेल. त्यासाठी ट्रेनिंगवर लक्ष केंद्रीत करावे लागेल, असेही धनोआ यांनी पत्रातून म्हटले आहे.
देशाच्या हवाईदल प्रमुखांनी अशा प्रकारचे पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी तत्कालीन जनरल – फिल्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांनी 1 मे 1950 रोजी आणि जनरल के. सुंदरजी यांनी 1 फेब्रुवारी 1986 रोजी अशा प्रकारे लष्करातील कर्मचार्‍यांशी संवाद साधला होता. धानोआ यांनी वायुसेना प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे 30 मार्च रोजी हे पत्र लिहिले आहे. त्यांनी एकूण 12, 000 अधिकार्‍यांना पत्र लिहिले आहे. धनोआ यांनी पत्रात वायुसेनेशी संबधीत अनेक बाबींचा उहापोह या पत्रात केला आहे.

गेल्या काही वेळापासून जम्मू-काश्मीरात लष्करी तळ आणि जवानांवर दहशतवादी हल्ले वाढले आहेत. सीमारेषेवरही वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. वारंवार होणा-या गोळीबारामुळे सीमारेषेजवळील एक हजारहून जास्त लोकांनी स्थलांतर केलं आहे. याशिवाय खो-यात दगडफेक आणि हिंसद निदर्शनेही वाढली आहेत.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्रातून इशारा देण्यात आला आहे की मर्यादित साधनांमध्ये पुर्ण तयारी करुन ठेवा. वायूसेनेकडे लढाऊ विमानांची संख्या कमी आहे. हवाई दलाकडे लढाऊ विमानांच्या 42 स्क्वॉड्रनची आवश्यकता आहे. मात्र त्यांची संख्या कमी झाली असून फक्त 33 राहिले आहेत.