कोणत्याही दबावाला न जुमानता लढा दिला!

0

चंदिगड । गेल्या अनेक वर्षांपासून अनेकदा धमक्या आल्या तरी त्याला भीक न घालता लढा देणार्‍या राम रहिमला शिक्षा देण्यास कारणीभूत ठरणार्‍या तरूणीने पहिल्यांदाच वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून आपल्या लढ्याची माहिती दिली आहे. आपण त्याला न घाबरता लढा दिल्याचे प्रतिपादन तिने केले आहे. बाबा राम रहिमला कारागृहात पाठविणार्‍या तरूणीची ‘हिंदू’ या वर्तमानपत्राने मुलाखत प्रकाशित केली आहे.

धाडसाचे कार्य
2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासहित पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना एक पत्र पाठवून एका साध्वीने झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिली. न्यायालयाने पत्राची दखल घेत सीबीआयला प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला. सीबीआयने 18 महिलांनी राम रहीमविरोधात साक्ष देण्यासाठी तयार केले मात्र फक्त दोन महिलांनी न्यायालयात येण्याची तयारी दर्शवली. त्यांच्यामुळे आज बलात्कारी राम रहीम कारागृहात आहे.

बाबा रडतोय
दरम्यान, पापी बाबा राम रहिम हा तुरूंगात सतत रडत असल्याची माहिती समोर आली आहे. 20 वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर बाबा पहिली रात्र अस्वस्थ करणारी गेली. बाबा रात्रभर बराकीत येरझार्‍या घालत होता. ना तो कुणाशी बोलला, ना कसला संकेत दिला. रात्री व पहाटेही जेवण घेतले नाही तुरुंगातील गजांवर डोके टेकून रडतच होता.