कोणत्याही वस्तूची खरेदी पक्क्या बिलानेच करा

0

मुक्ताईनगर : ग्राहकांनी फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी कोणतीही वस्तु किंवा माल खरेदी केल्यानंतर व्यापार्‍यांकडुन पक्के बिल घ्यावे, असे प्रतिपादन तहसिलदार जितेंद्र कुवर यांनी केले. मुक्ताईनगर तहसिल कार्यालयात ग्राहक दिनानिमीत्त आयोजित ग्राहक महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त भव्य ग्राहक महोत्सव आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थितांना तहसिलदार कुंवर यांनी मार्गदर्शन केले. तसेच ग्राहक हितासाठी शासनाने निर्णय विविध कायदे बनविले असून ग्राहकांनी याची माहिती घेण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन.जी. शेजोळे तर प्रमुख पाहुणे तहसिलदार जितेद्र कुवर, मोहन मेढे, लक्ष्णम चौके, छबिलदास पाटील, योगेश पाटील, शांताराम पाटील, राजु ब्रम्हक्षेत्रीय, सुभाष पाटील, सुभाष चिंचोले, गोकुळ पाटील, संजय निकम, विनोद माळी आदी उपस्थित होते.