कोणी गेले तर नव्यांना संधी!

0

मुंबई : काही लोक दलबदलू असतात. सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत. त्यामुळे कोणी गेले तर नवीन लोकांना संधी मिळेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी नारायण राणेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिल्याने काँग्रेससह राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.

भाजप मोठा खरेदी-विक्री संघ
नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा तसेच काँग्रेसमध्ये सुरू असलेली गळती याबाबत अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारला. याप्रश्नावर चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली. चव्हाण म्हणाले, पक्षातून कोणी गेले तर, नवीन नेतृत्व उभे राहते. काही लोक दलबदलू आहेत. काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे कोणी गेले तर नवीन लोकांना संधी मिळेल. भाजप देशातील मोठा खरेदी-विक्री संघ आहे. कोणी उपयुक्त आहे की नाही हे न पाहता प्रवेश देण्याचा त्यांनी धडका लावला आहे. यामुळे काँग्रेसचे फार नुकसान होणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर अनेक लोक जातात-येतात, असेही चव्हाण म्हणाले.