कोणी वार्ड दत्तक घेता का दत्तक

0

जळगाव (कमलेश देवर)। शहरातील लोकप्रतिनिधींचे राजकारणाचे केंद्र बिंदू असलेले शनिपेठ या भागात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याभागात एकेकाळी शहराचे राजकारण शिजविण्यात येत होते. लोकप्रतिनिधींचा नेहमी वास्तव असणारा शनिपेठ प्रभाग क्र. 7 हा भाग मोठ्या प्रमाणात समस्यांच्या विळख्यात सापडला असून याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनीच दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहरात देखील इतर भागात अशाच समस्या आहे. महानगरपालिकेकडे पैसे नसल्याने नगरसेवकांना निधी उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहे. अमृत योजना एकमेव पर्याय लोकप्रतिनिधीसाठी उरला असतांना त्याला श्रेयाच्या राजकारणामुळे देखील राजकीय इच्छाशक्ती पळवू पाहत आहे. कधीकाळी ह्याच जनतेच्या जीवावर आपण शहराच्या राजकारणात प्रवेश केला. मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊन निवडणुकीत पसंती दिली. याचा विसर जणू येथील लोकप्रतिनिधींना पडला असावा. जनशक्तिशी बोलतांना आमचे दुर्दैव आहे, की निष्क्रिय लोकांना आम्ही मतदान केले. यामुळे प्रभागाची अशी अवस्था असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कचरा कुंडीचे भाग्य उजळेना
शनिपेठ भागात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बाजारपेठ चा संपूर्ण कचरा याभागात जमा होत असतो. महापालिकेची घंटा गाडी सकाळी एका वेळी येत असल्याने नागरिकांची इतर वेळेला कचरा टाकण्यास अडचण निर्माण होते आहे. मोठ्या प्रमाणात कचर्‍याचे ढीग साचले असून कुंड्याची संख्या परिसरात वाढत चालली आहे. यामुळे शनिपेठेतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या वतीने समस्या वाढत असल्याने त्या सोडवण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी या परिसरात फिरायला देखील तयार नसल्याची व्यथा नागरिकांनी मांडली आहे.

महानगरपालिकेत पैसेच नाही
महापालिकेकडे शहरातील विकास कामासाठी पैसे नसल्याने मोठा वाद सुरु आहे. मनपाच्या वतीने वसुली करण्यात येत आहे. मात्र ते पैसे जातात कुठे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. कोट्यवधींचे कर्ज असल्याने महापालिका कर्जाच्या व्याजाची परत फेड करण्यामध्ये लाखोंचे व्याज नागरिकांच्या पैशा मधूनच जात आहे. करवसुली कारण्यात येत असून सुविधा देण्यास सत्ताधारी सह विरोधक देखील प्रशासनासह कमी पडत आहे.

महापालिके मध्ये निधी नाही. जळगाव शहराचे नाव अमृत योजनेमध्ये घेण्यात आले. मात्र त्यामध्ये देखील राजकीय मंडळी हस्तेक्षेप करून कामे लांबवणीवर टाकत आहे. आता तरी शहरात विकास कामे होवू देत माझी नम्र विनंती आहे.
– भगवान जैतकर

नगरसेवक निवडणुका झाल्यावर प्रभागा मध्ये पाहण्यास देखील येत नाहीत. आमचा वॉर्डात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महापालिका आयुक्तांनी तरी याविषयामध्ये लक्ष घालावे. स्वच्छता नागरिकांसाठी महत्वाची आहे.
– युवराज माळी

क्र.28 महापालिकेची दायमा शाळा याठिकाणी विद्यार्थी शिकत होते. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका नको म्हणून मनपाने शाळा बंद केली असावी. स्वच्छता नसल्याने महापालिकेवर शाळा बंद करण्याची नामुष्की येऊ शकते लाजिरवाणी बाब आहे.
– विश्‍वास महाजन

लोकप्रतिनिधीचे प्रभागाकडे दुर्लक्ष झाले आहे. महापालिका देखील निधी देत नसल्याने अडचण निर्माण झाल्याची माहिती मिळाली मात्र अनेक योजनांच्या माध्यमातून माहिती घेऊन निधी आणला जाऊ शकतो भाजप चे नगरसेवक वॉर्डात निवडणूक आले आहे.
– अक्षय जोशी

शहराला अमृताची आस? : स्मार्ट सिटी योजनेतून देशात सुवर्ण नागरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहराचे नाव वगळण्यात आले. महापालिकेची आर्थिक परीस्थिती व्यवस्थीत नसल्याने  जळगाववासीयांवर आली मात्र शहरासह जिल्ह्यात स्मार्ट सिटीत नाव घेण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसून आलेले नाही. त्या नंतर केंद्र शासनाच्या वतीने अमृत योजना कार्यान्वित करण्यात आली. मध्ये केंद्र जळगाव शहराचे नाव घेण्यात आले. राजकीय उदासीनता नेहमी जळगाव शहराच्या विकासाच्या आड आली. आणि शहर मागे मदत गेले. अशी अवस्था अमृत योजनेची झाली निविदा काढण्यावरून मोठा वादंग निर्माण झाला. अमृत योजनेमध्ये शहरातील विविध विकास कामे करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून विकास कामे होत नसल्याने अमृताची तहान जळगावकरांना लागली आहे.  अनेक दिसांपासून अमृत योजनेवर निविदांचे राजकारण करण्यात येत आहे. योजनेतून शहरातील पाणी पुरवठा, रस्ते, नाले असे विविध विकास कामे करण्यात येणार आहेत.