कोण आहेत गोविंदाच्या गाण्यावर धमाल डान्स करणारे काका!

0
जाणून घ्या सर्वात आधी फक्त जनशक्तिवर 
मुंबई :- सध्या सोशल मिडीयावर एका काकांनी केलेल्या धमाल डान्सची जोरदार चर्चा सुरु आहे. एका लग्न समारंभात आपल्या पत्नीसोबत नाचण्याने एक काका तुफान वायरल होत आहेत आणि वाहवाही मिळवीत आहेत. आतापर्यंत त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे.
अभिनेता गोविंदासारखा डान्स करणाऱ्या या काकांचे नाव आहे संजीव श्रीवास्तव आहे. संजीव हे भाभा इंजिनीयरिंग इन्स्टिट्यूट, भोपाळ येथे प्रोफेसर आहेत. त्यांनी नागपूरच्या प्रियदर्शनी इंजिनीयरिंग कॉलेजमधून त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्तीपासून डान्सची प्रेरणा घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. हा डान्स त्यांनी १२ मे’ला आपल्या मेव्हण्याच्या लग्नात केला होता. तो इतका व्हायरल होईल, असे त्यांनाही वाटले नव्हते. त्यांच्याच एखाद्या विद्यार्थ्याने हा व्हिडिओ व्हायरल केला असावा, असा त्यांचा अंदाज आहे. फेसबुकवर या व्हिडिओला खूप लाइक्स मिळाले आहेत. ‘आपके आ जाने से’ या गाण्यावर त्यांनी धम्माल डान्स केला आहे.  सध्या या डान्सला जोरदार प्रतिसाद मिळत असून याच काकांचा दुसरा व्हिडियो देखील व्हायरल झाला आहे.