कोण म्हणतं माझ्या घरात, माझं काही चालत नाही !

0

शिंदखेडा । रेशमाच्या बाबांनी , काल लाथा बूक्यांनी , झोडपून मज काढीला , हात नका लावू माझ्या बॉडीला या आणि यासारख्या सादर केलेल्या विनोदी कवितांनी शिंदखेडा महाविद्यालयातील विद्यार्थी हसून हसून लोटपोट झाले .प्रचंड टाळ्या आणि तेवढेच हास्याचे फवारे यांनी ओटपोट भरलेला हा कार्यक्रम दिड तास चांगलाच रंगला… येथील एमएचएसएस कनिष्ठ महाविद्यालयात श्रावण सरी हा विनोदी कविता सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. प्राचार्य डी.सी.गिरासे अध्यक्षस्थानी होते. मराठी विभागाचे प्रमूख प्रा.जी.के.परमार यांनी हा कार्यक्रम आयोजीत केला होता. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

टाळ्यांचा गजरात प्रतिसाद
या पोरी म्हणजे पोरी असतात ; कधी गोड बूंदी तर कधी, तिखट कचोरी असतात या प्रा. सी. डी. डागा यांनी सादर केलेल्या कवितेने प्रचंड हशा निर्माण केला. सांग तूझ्यासाठी काय नाही केले या प्रा. भैया मंगळे यांनी सादर केलेल्या कवितेने पून्हा टाळ्या मिळविल्या. तर प्रा. पी. टी. पाटील यांनी भूतकाळात डोकावल्याशिवाय मजा काही मिळत नाही, मागे वळून पाहील्यावर हसावं की रडावं कळत नाही ही कविता सादर करून वर्तमान काळ आणि भूतकाळ यांतील फरक विनोदी पध्दतिने मांडला.

नोटांबदीवर कविता सादर
प्रा.जी.पी.शास्त्री यांनी रेशमाच्या..बाबांनी यासह कोण म्हणतं माझ्या घरात , माझं काही चालत नाही, गरम पाणी मिळाल्याशिवाय, भांडी कधीच घासत नाही ह्या कविता सादर करून धमाल ऊडवून दिली.प्रा.परेश शहा यांनी नोटाबंदीवर आधारीत झिंग झिंग झिंगाट च्या चालीवर कविता सादर करून प्रचंड टाळ्या मिळविल्या. प्रा संदिप गिरासे यांनी त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, तूमचं काय गेलं ही कविता सादर करून धमाल ऊडविली.

प्राचार्यांनी केले मार्गदर्शन
प्रा.दिपक माळी यांनी कुमार विश्वास यांची कोई मूझे दिवाना कहे ही कविता गाऊन विद्यार्थ्यांना ताल धरावयास भाग पाडले. तर प्रा. डी. ए. पवार यांनीही कविता सादर करून टाळ्या मिळविल्या. बारावीची विद्यार्थीनी प्रियंका वाडिले हीने स्वरचित कविता सादर केली. दरवर्षी महाविद्यालयात हा कार्यक्रम केला जातो.प्राचार्य गिरासे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.