आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, तहसीलदार गिरासेंना निवेदन
चोपडा – महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या आदेशा नुसार चोपडा तालुक्यातील कोतवाल संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी उद्या दि.२० डिसेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.आज संध्याकाळी कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे लेखी निवेदन आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, तहसीलदार दीपक गिरासे यांना देण्यात आले.
कोतवालांचे बेमुदत काम बंद आंदोलन
ब्रिटीश काळापासून आज देखील कोतवाल पाच हजार रुपये मानधनावर काम करीत आहेत.शासन दरबारी महत्वाची कामे व जबाबदारी कोतवाल कर्मचारी प्रामाणिकपणे तुटपुंज्या मानधनावर पार पाडीत असून,सध्या कमी मानधनामुळे हालाखीचे जीवन जगत आहेत. राज्यातील कोतवाल कर्मचाऱ्यांचा चतुर्थश्रेणी म्हणून कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत समावेश करण्यात यावा यासाठी २०११ पासून शासनस्तरावर संघटनेकडून पाठपुरावा सुरू आहे.परंतु शासनाने आजपर्यंत कोणताच निर्णय घेतलेला नसल्याने शासनाच्या विरुद्ध कोतवाल कर्मचाऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला असून, आपल्या मागण्यांसाठी चोपडा तालुक्यातील कोतवाल संघटनेचे ४० कर्मचाऱ्यांनी उद्या दि.२० डिसेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज संध्याकाळी ५ वाजता आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व तहसीलदार दीपक गिरासे यांना आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन दिले. याप्रसंगी कोतवाल संघटनेचे सुनील निकुंभ, जितेंद्र धनगर, अशोक कोळी, अनिल मोरे, अमीन पिंजारी, तानाजी महाले, दिलीप न्हावी, सुनील सैंदाणे, लक्ष्मण न्हावी, भावलाल रायसिंग यांचेसह आदी कोतवाल उपस्थित होते.