येरवडा : तलाठी कार्यालयात कोतवालीचे काम करणार्या कर्मचार्यांकडून शेतकर्यांकडून सातबार्यासाठी लूटमार होत असल्याने अशा अनागोंदी कारभारामुळे शेतकरी हैराण झाला आहे.
पिंपळे (खालसा) येथील ग्रामपंचायत कार्यालयात कोतवालकीचे काम करणार्या व्यक्तीकडून परिसरातील शेतकर्यांकडून सातबाराचा उतारा मिळविण्यासाठी हजारो रुपये उकळले जात आहेत. विशेष म्हणजे चारचाकीमधून फिरण्याइतकी या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती अचानकच कशी सुधारली? हा चर्चेचा विषय झाला आहे. कोतवालाच्या त्रासाला कंटाळलेल्या स्वप्नील धुमाळ ह्या व्यक्तीने वरिष्ठ अधिकार्याकडे वारंवार तक्रार केल्याने अखेर कर्मचार्याची बदली शिरूर येथील तहसील कार्यालयात करण्यात आली. संबंधित कर्मचार्याकडून शिरूर येथील कार्यालयात ही अशाप्रकारे पिळवणूक होत असल्याने या कर्मचार्याचा अनागोंदी कारभार थांबणार का?असा संतप्त सवाल शेतकर्यांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे लाचलुचपत अधिकारी करत असलेल्या कारवाईत असे कर्मचारी कसे अडकत नाहीत असा प्रश्नही विचारला जात आहे.