कोथळी येथे खडसे कुटुंबियांनी साजरा केला बैलपोळा

मुक्ताईनगर प्रतिनिधी……

बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे वर्षभर शेतात सेवा देणाऱ्या शेतकऱ्यांचा साथीदार असलेल्या

वर्षभर घेत असलेल्या अमूल्य मेहनती बद्दल बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा उत्साहात साजरा केला जातो

माजी मंत्री आ एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी कोथळी

येथे बैलपोळ्या निमित्त बैलांचे पुजन करून बैलांना पुरण पोळीचा नैवद्य खाऊ घातला

व शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येऊं दे अशी प्रार्थना केली

यावेळी ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या शेतकरी बांधव आपल्या शेतात राबून काळ्या आईची सेवा करून धान्य पिकवत असतात त्यांना या कार्यात बैलांची मोलाची साथ लाभते वर्षभर शेतात राबून घेत असलेल्या मेहनती बद्दल वृषभ राजाचे ऋण व्यक्त करण्याचा, भुतदयेची शिकवण देणारा दिवस म्हणजे बैल पोळा.

दरवर्षी आम्ही कोथळी येथे वृषभ राजाचे पुजन करतो सालाबाद प्रमाणे यावर्षी सुध्दा

वृषभ राजाचे पुजन करून त्यास पुरण पोळीचा नैवद्य खाऊ घातला

व पिक पाणी व्यवस्थित होऊन शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येऊं दे अशी वृषभ राजा कडे प्रार्थना केल्याचे खडसे यांनी सांगितले