कोनगांव येथे तरुणाची आत्महत्या

0

भिवंडी – कल्याण मार्गावरील कोनगांव येथे एका तरुणाने बेडरूममधील छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.प्रणव माणिक पाटील ( २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नांव आहे.त्याने कल्याणहून घरी आल्यावर राहत्या घराच्या पहिल्या माळ्यावरील बेडरूमच्या छताच्या पंख्याला काथ्याने गळफास लावून आत्महत्या केली.

हि घटना छोटी बहीण स्नेहल हिच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केली असता शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेवून प्रणवचा गळफास काढून रुग्णालयात हलवण्यात आले.मात्र उपचारापूर्वीच प्रणवचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.या मृत्यूची नोंद कोनगांव पोलीस ठाण्यात केली असून प्रणव याने प्रेम प्रकरणातून अथवा अन्य कोणत्या कारणातून आत्महत्या केली ? याचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस.व्ही.शिंदे करीत आहे.