कोपर्डीच्या निषेधार्थ मूक मोर्चा

0

जळगाव । अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या भयंकर घटनेला एक वर्ष पुर्ण होऊनही तपासात गती नसल्याच्या निषेधार्थ गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापासून याला प्रारंभ झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली याचे आयोजन करण्यात आले. कोपर्डी घटनेतील मुख्य आरोपी तथा नराधमाला एक वर्षाचा आत शिक्षा व्हायला झाली पाहिजे होती ती झाली नाही. सरकारला जाग येण्यासाठी व हा खटला जलद गतीने न्यायालयात चाचला पाहिजे अशी मागणी करत घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला.

नागरीकांच्या भावना तीव्र- अजित पवार
यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन दिल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. यासाठी राज्याच्या प्रमुखांनी सांगितले होते की ’आम्ही जलद न्यायालयात घेवून लवकर निर्णय देण्याचा प्रयत्न करू असे सांगण्यात आले होते. परंतू एक वर्ष झाले तरी यावर कुठल्याच पद्धतीने अथवा गतीने कारवाई झाली नाही. एक वर्ष होवूनही लोकांच्या भावना अजून मंदावल्या नसून तीव्र आहे. शासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यावेळी समाजात तिव्रता पाहायला मिळत होती. त्यावेळी शासनाने काही समितीची नेमणूक करून जलदगतीने काम केले नाही. भविष्यात कोणत्याही मुलीवर, महिलांवर कोणत्याही प्रकारे अत्याचार होणार नाही. तसेच शासनाला जाग यावी जळगावमध्ये येवून कोपर्डी घटनेप्रति भावना तीव्र आहेत या भावना शासन आणि मुख्यमंत्र्यांपर्यत पोहचविण्यासाठी हा मूक मोर्चा काढला असल्याचे सांगितले.

यांनी घेतला सहभाग
यावेळी माजी विधानसभाध्यक्ष तथा पक्षाचे प्रभारी दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, स्मिताताई पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी, आमदार डॉ. सतीश पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार राजीव देशमुख, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, अनिल भाईदास पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोपर्डी अत्याचारानंतरचा घटनाक्रम

13 जुलै 2016 – सायं. 7.30 वाजेच्या सुमारास कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून

15 जुलै – मुख्य आरोपी पप्पू उर्फ जितेंद्र शिंदे यास अटक

16 जुलै – दुसरा आरोपी संतोष भवाळ यास अटक

17 जुलै – तिसरा आरोपी नितीन भैलुमे यासही अटक

18 जुलै – दोघा आरोपींवर जिल्हा न्यायालयात हल्ला

20 जुलै – कर्जत येथील मुलींकडून घटनेचा निषेध

24 जुलै – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कोपर्डीला भेट

23 सप्टेंबर – कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ अहमदनगरात पाहिला मराठा क्रांती मोर्चा

7 ऑक्टोबर – तिघा आरोपींविरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

1 एप्रिल 2017 – तिघा आरोपींवर हल्ला

22 जून – खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने एकूण 31 साक्षीदार तपासले़

23 जून – खटल्यात बचाव पक्षाकडून मुख्यमंत्री व सरकारी पक्षाच्यावतीने खटला चालवित असलेले अ‍ॅड. निकम यांची साक्ष

2 जुलै – कोपर्डीत सूर्योदय संस्थेच्यावतीने मुलीचे स्मारक बांधण्याचा निर्णय

7 जुलै – अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची साक्ष घेण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

13 जुलै- वर्ष उलटूनही गेल्यावर संबंधीतांवर कठोर कारवाई न झाल्याने राज्यभरात निदर्शने