कोपर्डी आणि भारतातील स्त्री

0

1 जानेवारी 2017 ला प्रचंड जनसमुदाय बंगळुरूमध्ये गोळा झाला होता. दारू पिऊन आचकट विचकट नाचत दारूच्या नशेत आई-बहिणींच्या शरीराकडे भुकेल्या लांडग्यासारखा बघू लागला. मग ताळतंत्र सोडून त्यांच्या अंगावर हात घालू लागला व भगिनींच्या अब्रूचे धिंडवडे उडवू लागला. जोरात ओरडू लागला हॅप्पी न्यू इअर… असे अनेक प्रकार भारतभर फोफावू लागले. 13 जुलै 2017 रोजी कोपर्डीच्या कोवळ्या वयातील निष्पाप श्रद्धाच्या अमानुष हत्येला एक वर्ष उलटले तरी अद्याप तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही की गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही. संपूर्ण समाजाच्या भावना आता या ज्वलंत प्रश्‍नाशी जोडल्या गेल्या आहेत. विकृत मानसिकतेच्या नराधमांनी तिच्या शरीराचे लचके तोडून तिच्यावर निर्घृण बलात्कार केला आणि त्यात त्या निरागस जीवाचा बळी गेला. ही घटना समाजाची मान खाली घालायला लावणारी आहे. श्रद्धाच्या बाबतीत घडलेल्या घटनेप्रमाणे देशात घडलेल्या स्त्रियांच्या अपमानाच्या अनेक घटना या देशाला कलंक लावणार्‍या आहेत. श्रद्धा ही केवळ तिच्या कुटुंबीयांची नसून समाजाशी तिचं भावनिक नातं जोडलं गेलं आहे. तिच्यावर झालेला अन्याय हा स्त्री असुरक्षिततेचे प्रमाण आहे.हा प्रश्‍न मोदी-फडणवीसांच्या राज्यात कसा बघितला जातो? स्त्री सुरक्षित आहे का? मुलींना मुक्तपणे फिरता येते का? ग्रामीण भागात बालविवाह का केले जातात?

स्त्रीला पोलीस कायदा शिकवतात आणि गुन्हेगारांवर कारवाई करत नाहीत. अनेकदा पोलीस नराधमांना मदत करतात व मुलींना धमकी देतात, असाच एक प्रकार यवतमाळमध्ये होत आहे. सृष्टी प्रवीण दिवटे, वय-21, यवतमाळ येथील रहिवासी तिचे दिवंगत वडील 27.08.2016 रोजी प्रवीण दत्तूजी दिवटे यांचा बंटी उर्फ आनंद जैस्वाल, विशाल दुबे, विक्की राय व अनेक लोकांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून धारधार शस्त्राने तसेच 4 गोळ्या घालून अतिशय क्रूरपणे खून केला आहे. या सर्व घटनेची सृष्टी प्रत्यक्ष साक्षीदार आहे, एक आठवड्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सृष्टीच्या कुटुंबास त्रास देण्यास सुरुवात केली. आई आणि दोन बहिणीच या कुटुंबात आहेत. त्यांच्यावर 307 सारखे खोटे गुन्हे दाखल केले. वास्तविक जखम असल्याशिवाय 307 कलम लावता येत नाही, तरी 17 वर्षांच्या श्‍वेेताने पिस्तूल दाखवले म्हणून पोलिसांनी 307चा कलम त्यांच्यावर लावला. तिच्याकडे पिस्तूलच नाही. यवतमाळ पोलिसांमार्फत खुनाचा योग्य तपास होत नाही. पोलीस वेळोवेळी आरोपींना मदत करत होते. मुली बाहेर गेल्या की गाडीला अडवणे, धमकवणे, घरासमोर येऊन शिट्या मारणे, उचलून घेऊन जाण्याची धमकी देणे. तुमचा कोपर्डी करू. अशाप्रकारे मुलींवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना कुणाचाच आधार नाही. गुंडांना घाबरून नागरिक बघ्याची भूमिका घेतात. सर्व गुंड उत्तर भारतीय आहेत आणि भाजपचे लोक आहेत. शेवटी मुलींनी मला फोन केला. मी या मुलींना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना ओळखतदेखील नव्हतो. 11.07.2017 रोजी मी त्यांच्या घरी गेलो. तक्रार निवेदन घेऊन पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचेकडे गेलो व बोलणे केले, त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी मला सांगितले की मुलीबरोबर खासगी बोलायचे आहे. त्या पोलीस अधीक्षकाने अतिशय लाज वाटेल इतक्या घाण भाषेत मुलींना धमकावले. तुम्ही शांत बसा, नाहीतर मी तुम्हा दोघींना जेलमध्ये पाठवेन, त्या आरोपीच्या नादाला लागू नका, ते लोक तुम्हाला जीवाने मारतील अशा भाषेत मुलींचा अपमान केला व आरोपींची भीती दाखवली. एका खझड अधिकार्‍याने पोलिसांच्या वर्दीचा अपमान केला. मी मुलींना घेऊन गृहराज्यमंत्री केसरकर आणि मुख्यमंत्र्यांकडे गेलो आणि मुलींना सुरक्षा देणे व पोलीस आणि अधीक्षकावर कडक कारवाई करण्यास आग्रह धरला आहे तसेच अधीक्षक योग्य तपास करणार नाहीत म्हणून तपास उइखमार्फत करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तसेच 30 जुलैला यवतमाळ येथे नागरिकांचा मेळावा घेऊन पुढची दिशा ठरवणार आहोत. स्त्री सन्मानाचे नवीन पर्व भारतात आणू. 30 जुलैला यवतमाळ येथे एकत्र येऊ.
ब्रि. सुधीर सांवत – 9987714929